Torres scam| टोरेस प्रकरणी सीए विरुध्दखटला चालणार नाही

Torres scam

मुंबई – टोरेस घोटाळ्याचे (Torres scam) बिंग फोडणारे चार्टर्ड अकाउंटंट (CA) अभिषेक गुप्ता (Abhishek Gupta) यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने (PMLA Court) मोठाच दिलासा दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने गुप्ता यांचे नाव आरोपींच्या यादीतून वगळले.


विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे (R. B. Rote) यांनी हा निकाल दिला. या गुन्ह्यात कोणत्याही टप्प्यावर , कोणत्याही प्रकारे गुप्ता यांचा सहभाग होता असा कोणताही पुरावा पोलिसांनी सादर केलेला नाही. त्यामुळे गुप्ता यांची या प्रकरणात मर्यादित भूमिका पाहता त्यांच्याविरूध्द पीएमएलए कायद्यान्वये खटला चालविला जाऊ शकत नाही, असे न्या. रोटे यांनी सांगितले.


या प्रकरणातील अन्य १२ आरोपींवर खटला चालविण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना चांदी , सोने आणि मौल्यवान रत्नांमधील गुंतवणुकीवर आठवड्याला २ ते ९ टक्क्यांपर्यंतचा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. हा घोटाळा सुमारे १७७.११ कोटी रुपये असल्याचा पोलिसांचा दावा आहे.