Home / Uncategorized / Sanjay Raut PC: मावळे वरण-भात खाऊन लढले का ? मांसविक्री बंदीवरून राऊतांचा टोला

Sanjay Raut PC: मावळे वरण-भात खाऊन लढले का ? मांसविक्री बंदीवरून राऊतांचा टोला

UBT MP Sanjay Raut

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj’s)शूर मावळे हिंदवी स्वराज्यासाठी छातीचा कोट करून लढले. ते काय वरण-भात आणि तूप (dal-rice and ghee)खाऊन लढले का, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी १५ ऑगस्टनिमित्त मांस-मच्छी विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे समर्थन करणाऱ्यांना लगावला.


१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day)मांस-मच्छी विक्रीवर बंदी घालणे हा मूर्खपणा आहे. हा दिवस शौर्याचा दिवस आहे. मोठा लढा देऊन, शेकडो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवले आहे. ते काही मोदी – शहांमुळे मिळालेले नाही. सध्या जो शाकाहारी – मांसाहारीचा (non-vegetarians)वाद चालू आहे तो मर्द मराठ्यांच्या महाराष्ट्राला शोभणारा नाही. शिवरायांचे मावळे (. Shivaji Maharaj’s Mavalas)वरण-भात खाऊन लढले नाहीत. पेशवेदेखील मांसाहारी होते. आता जे शाकाहारीची बाजू हिरीरीने मांडत आहेत, त्यांचा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काडीचेही योगदान नाही, असे राऊत म्हणाले.


गुवाहीटीतील बंडावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde)आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर राऊत यांनी पुन्हा एकदा घणाघाती टीका केली. कामाख्या देवीसमोर रेडे कापून सत्तेवर आलेल्यांना शाकाहारीवर बोलण्याचा अधिकार नाही, असे राऊत म्हणाले.