Home / Uncategorized / Dagdusheth Trust : दगडूशेठ गणपती ट्रस्टकडूनपूरग्रस्तांसाठी १ कोटींचा निधी

Dagdusheth Trust : दगडूशेठ गणपती ट्रस्टकडूनपूरग्रस्तांसाठी १ कोटींचा निधी

Dagdusheth Trust : राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर (Farmers)ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस...

By: Team Navakal
Dagdusheth Trust

Dagdusheth Trust : राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर (Farmers)ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस (Chief Minister’s Relief Fund) १ कोटी रुपयांची मदत देण्यात आली. हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)यांना सुपूर्द करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतर संस्थांकडूनही निधी देण्यात आला आहे. सुवर्णयुग सहकारी बँकेकडून (Suvarnayug Cooperative Bank d) २५ लाख, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना (Marathi Construction) पुणेच्या वतीने ५१ लाख ५१ हजार, बँक ऑफ इंडिया (Bank of India)स्टाफ युनियनकडून ५ लाख, कासार सोशल ग्रुप पुणेच्या वतीने १ लाख २१ हजार, विठ्ठल दिनकर बोरकर यांनी १० हजार आणि चंद्रशेखर तुकाराम झेडगे यांनी ५ हजार रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द केले.

या वेळी दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे (Dagdusheth Halwai Trust)सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने (Hemant Rasane,) म्हणाले, शेतकरी हा दिवस-रात्र मेहनत करून सर्वांना अन्नधान्य पुरवतो. कोरोनासारख्या संकटातही तो खंबीरपणे उभा राहिला. पण अतिवृष्टीने त्याला मोठा फटका बसला आहे. या काळात शेतकऱ्यांना आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून निश्चितच बळीराजाला दिलासा मिळेल आणि तो पुन्हा उभारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


हे देखील वाचा –

3 हेक्टरपर्यंत मदत! 31628 कोटींचे सरकारचे पॅकेज, 29 जिल्हे, 253 तालुक्यांना घर, विहीर, रस्ते, पेरणीत मदत

इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांचा पुतळा पुढील वर्षी पूर्ण उभारणार पुतळ्याचे बूट आले

 देवीच्या मिरवणुकीत पुन्हा एकदा राडा! जळगावात देवीच्या विसर्जना दरम्यान १३ जण जखमी

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या