Home / Uncategorized / Mithun Manhas: दिल्लीचे रणजी खेळाडू मिथुन मन्हास बीसीसीआयचे अध्यक्ष होणार?

Mithun Manhas: दिल्लीचे रणजी खेळाडू मिथुन मन्हास बीसीसीआयचे अध्यक्ष होणार?

Mithun Manhas – दिल्ली संघाचे माजी कर्णधार मिथुन मन्हास (Mithun Manhas) (४५) यांनी बीसीसीआयच्या (BCCI )अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला....

By: Team Navakal
Mithun Manhas

Mithun Manhas – दिल्ली संघाचे माजी कर्णधार मिथुन मन्हास (Mithun Manhas) (४५) यांनी बीसीसीआयच्या (BCCI )अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख काल दुपारपर्यंत होती. त्याआधीच मन्हास यांनी बीसीसीआयच्या मुख्यालयात अर्ज सादर केला. ते या पदासाठी आघाडीचे उमेदवार असल्याची चर्चा आहे.

मन्हास यांनी १९९७-९८ ते २०१६-१७ या कारकिर्दीत १५७ प्रथम श्रेणी सामने, १३० लिस्ट ए सामने आणि ५५ आयपीएल सामने खेळले आहेत. गेल्या महिन्यात रॉजर बिन्नी यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. नवी दिल्लीतील एका अनौपचारिक बैठकीनंतर मन्हास यांचे नाव पुढे आले आहे. ते आघाडीचे दावेदार मानले जात आहेत.

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी २८ सप्टेंबरला होणार आहे. त्यावेळी अध्यक्षपदासह काही महत्त्वाच्या पदांवर निवड केली जाणार आहे. दरम्यान, नवीन कार्यकारिणी पुढील कार्यकाळासाठी तयार केली जात असून मन्हास यांना अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएल संचालन परिषदेचे अध्यक्ष अरुण धुमाळ हे आपल्या पदावर कायम राहतील, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.


हे देखील वाचा 

ईशान्य भारताकडे काँग्रेसचे दुर्लक्ष इटानगरमध्ये पंतप्रधानांची टीका

ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची जालन्यात गाडी पेटवली

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या