Dr Sampada Munde Case – फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्याप्रकरणी(Dr Sampada Munde Case) महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी डॉ. मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन पाठिंबा दिला, तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आरोप केले. त्याचबरोबर शरद पवार गटाचे (Sharad Pawar faction) नेते मेहबूब शेख (Mehboob Sheikh) मंत्रालयावर मोर्चा काढून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी (SIT) स्थापन करण्याची मागणी केली. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी फोनवरून कुटुंबियांशी संवाद साधला आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भूमिका पटलेली नाही. त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ होता हे त्यांना विचारणार असल्याचे स्पष्ट केले. ज्यामुळे चाकणकर यांचे महिला आयोग अध्यक्षपद धोक्यात आल्याची चर्चा आहे.
उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांनी आज वडवणी येथील कवडगाव येथे जाऊन महिला डॉक्टरच्या कुटुंबाची भेट घेतली.यावेळी ग्रामस्थांनी याप्रकरणात एसआयटी स्थापण्याची मागणी केली.त्याचबरोबर त्यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी अंधारे यांनी संपदा यांच्या आई – वडिलांना सांत्वन करत म्हटले की,तुम्ही चेहरा लपवावे असे काहीही तुमच्या मुलीच्या बाबतीत घडलेले नाही किंवा तुमच्या मुलीने कोणतीही लाजिरवाणी गोष्ट केलेली नाही. तुम्ही विनाकारण तोंड झाकू नका.
दिल्लीत काँग्रेस खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की,तरुणीच्या तक्रारीकडे वारंवार दुर्लक्ष केले, तिच्यावर अत्याचार झाले आणि दबावाखाली मृत्यूला आत्महत्येचे रूप दिले. मुख्यमंत्री फडणवीस फलटणला गेले आणि रणजीतसिंह निंबाळकर यांना अभय दिले. त्यांना क्लीन चिट देण्याची सवय लागली आहे. एक माजी भाजपा नेत्याला वाचवण्यासाठी प्रशासनाचा गैरवापर केला जात आहे. मुख्यमंत्री तुम्ही कोणाला वाचवत आहात? तुम्ही न्यायाधीश कसे झालात? चौकशीचे काम ज्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले त्यांनाच का दिले ?









