Home / Uncategorized / PM Modi : पंतप्रधान मोदींच्या गुजरातचा शिक्षण दर्जा सर्वात वाईट

PM Modi : पंतप्रधान मोदींच्या गुजरातचा शिक्षण दर्जा सर्वात वाईट

PM Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा (Education Quality) हा भारतातील 10 राज्यांमध्ये सर्वात वाईट आहे....

By: Team Navakal
PM Modi Manipur Visit

PM Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा (Education Quality) हा भारतातील 10 राज्यांमध्ये सर्वात वाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील परख या राष्ट्रीय सर्वेक्षण अहवालातून (National survey report)ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. यामुळे गुजरात मॉडेलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


शिक्षण विभागाच्या (Education Department)मते, राज्यात शिक्षणावर प्रचंड वार्षिक खर्च केला जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक सुधारणांमध्ये सक्रिय सहभाग आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन अवलंबला जात आहे. मात्र या अहवालाने राज्याच्या शैक्षणिक स्थितीचे वास्तव समोर आणले आहे. परखने 21 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य, गणित (Mathematics), विज्ञान (science)आणि सामाजिक शास्त्र ज्ञान याचे मूल्यमापन केले. पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता यामध्ये गुजरातची कामगिरी (Gujarat’s performance)समाधानकारक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या निष्कर्षांमध्ये मात्र राज्य खूपच मागे पडले आहे.


या अहवालानंतर गुजरात सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिक्षण सुधारणा कार्यक्रमांच्या परिणामकारकतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुणोत्सव आणि 5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले विद्या समीक्षा केंद्र (Vidya Samiksha Kendra)या सारख्या कार्यक्रमांची परिणामकारकता नव्याने तपासावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत. गुजरातमधील 29 जिल्ह्यांपैकी एकही जिल्हा राष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवू शकला नाही. 28 जिल्ह्यांची कामगिरी अत्यंत खराब दर्जाची आहे. जुनागढ (21 वा), सोमनाथ (Somnath) (28 वा) आणि द्वारका (29 वा) हे सर्वात वाईट कामगिरी करणारे जिल्हे ठरले आहेत.


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डिजिटल पद्धतीने माहितीचे विश्लेषण करण्यासाठी उभारण्यात आलेले विद्या समीक्षा केंद्र म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. केवळ दिखाव्यासाठी राबवलेले उपक्रम नकोत. विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्गखोलीतील शिक्षण अधिक चांगले व्हावे.


हे देखील वाचा –

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकचीपाच-सहा विमाने पाडली ! हवाई दल प्रमुखांचे वक्तव्य

 सब मेरे दोस्त के नाम कर दो ! काँग्रेसचा नवा एआय व्हिडिओ

मुंबईच्या समुद्र किनार्‍यांवरील जीवरक्षकांची संख्या वाढणार

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या