तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांना प्रवेशबंदी

Entry banned for priests who spat in the Tuljabhavani temple premises

Entry banned for priests who spat in the Tuljabhavani temple premises

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई(Tuljabhavani temple) तुळजाभवानीच्या मंदिरातील आठ पुजाऱ्यांवर मंदिर परिसरात तंबाखू खाऊन थुकल्यामुळे मंदिर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

मंदिरातील काही पुजारी मंदिर परिसरात तंबाखू खाऊन थुकत (pujari misconduct)अस्वच्छता करत होते. या प्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानने पुजाऱ्यांना (pujari spitting incident)नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगितले होते. पण तरीही पुजाऱ्यांच्या वागण्यात बदल झाला नाही आणि अशोभनीय वर्तन सुरू होते. तसेच या नोटीशींना समाधानकारक उत्तर न दिल्याने प्रशासनाने संस्थान कडूनच मंदिराच्या देऊळ कवायत कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. नोटीस बजावल्यावर माफीनामा सादर करणाऱ्या सहा पुजाऱ्यांना महिनाभराची प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर मंदिर संस्थांची नोटीसच न स्वीकारणाऱ्या दोन पुजाऱ्यांना तीन महिने प्रवेश बंदी लागू करण्यात आली.