Home / महाराष्ट्र / शाळेच्या पहिल्या दिवशी फडणवीस,पवार, शिंदेंकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळेच्या पहिल्या दिवशी फडणवीस,पवार, शिंदेंकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

मुंबई – आज राज्यभर शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devmdra Fadnvis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde), अजित...

By: Team Navakal
Fadnavis welcomes students

मुंबई – आज राज्यभर शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devmdra Fadnvis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde), अजित पवार (dcm Ajit Pawar) आणि मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी वेगवेगळ्या विभागातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये आजपासून शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ सुरु झाले. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्यकर्त्यांनी शाळांमध्ये उपस्थिती लावली.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दुर्वेस येथील शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्याशी संवादही साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा तालुक्यातील कोडोली तालुक्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना चॉकलेट व गुलाब पुष्प दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारत त्यांना खूप शिका, मोठे व्हा आणि देशाचा नावलौकिक वाढवण्याचा संदेश दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशाचे वाटपही केले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे विद्यार्थ्यांना सजविलेल्या बैलगाडीत बसवून चक्क शाळेपर्यंत नेऊन सोडले. कोल्हापुरातील इचलकरंजीच्या शाळेत विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून फेटा बांधून स्वागत करण्यात आले.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या