Home / Uncategorized / FIR Against Organizers : सत्याचा मोर्चा व मूक मोर्चा; आयोजकांवर गुन्हा दाखल

FIR Against Organizers : सत्याचा मोर्चा व मूक मोर्चा; आयोजकांवर गुन्हा दाखल

FIR Against Organizers – निवडणूक आयोगाच्या (Election Commission)विरोधात काल मुंबईत काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चाच्या (Satyacha Morcha)आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला...

By: Team Navakal
FIR Against organizers
Social + WhatsApp CTA

FIR Against Organizers – निवडणूक आयोगाच्या (Election Commission)विरोधात काल मुंबईत काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चाच्या (Satyacha Morcha)आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे भाजपाने काढलेल्या मूक मोर्चाच्या (Silent March)आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आली आहे.

मविआ (Maha Vikas Aghadi)आणि मनसे (Maharashtra Navnirman Sena)यांनी मुंबईतील फॅशन स्ट्रीट ते महापालिका मुख्यालय या मार्गावर मतदार याद्यांतील घोळ, मतदारांची दुबार नावे आणि मतचोरीच्या तक्रारींवरून उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सत्याचा मोर्चा काढला होता. या मोर्चाला पोलिसांनीऔपचारिक परवानगी नाकारली होती. तरीदेखील, प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून आणि बेकायदेशीरपणे सभा घेण्यात आल्यामुळे मुंबई पोलिसांनी मोर्चाच्या आयोजकांविरुद्ध डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात (D.B. Marg Police )गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महाविकास आघाडी आणि मनसेच्या या संयुक्त आंदोलनाला (MVA-MNS protest)भाजपाने तीव्र विरोध केला होता. या मोर्चाला फेक नरेटिव्ह म्हणत भाजपाने गिरगाव येथील टिळक उद्यानासमोर मूक आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनासाठीही आयोजकांनी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे भाजपाने काढलेल्या मूक मोर्चावरही गुन् दाखल करण्यात आला आहे.


हे देखील वाचा –

पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत वाद

३ नोव्हेंबरला राज्यातील वकीलांचे एक दिवस कामबंद आंदोलन

मुंबईत कबुतरखान्यांसाठी चार नव्या जागांचा विचार

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या