Home / Uncategorized / Gautami Patil’s Car Hits Rickshaw : गौतमी पाटीलच्या कारची रिक्षाला धडक! २ जखमी

Gautami Patil’s Car Hits Rickshaw : गौतमी पाटीलच्या कारची रिक्षाला धडक! २ जखमी

Gautami Patil’s Car Hits Rickshaw – प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटीलच्या कारने एका उभ्या असलेल्या रिक्षाला जोरात धडक दिली. या भीषण...

By: Team Navakal
Gautami Patil’s Car Hits Rickshaw

Gautami Patil’s Car Hits Rickshaw – प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटीलच्या कारने एका उभ्या असलेल्या रिक्षाला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले.

मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर वडगाव पुलाजवळ हा अपघात घडला. अपघातावेळी गौतमी या कारमध्ये नव्हती.

महामार्गावर वडगाव पुलाजवळ एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या गौतमी पाटीलच्या कारने उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. रिक्षात असलेल्या चालकासोबतच दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. सिंहगड पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.


हे देखील वाचा –

अतिवृष्टीतही राज्यात ५ दसरा मेळावे होणार

मला शांतता नोबेल द्या! अमेरिकेचा अपमान करू नका!ट्रम्प यांचा हट्ट ! सात युद्ध थांबवल्याचा दावा

भिवंडीत मराठीची गरज काय?अबू आझमींचे वादग्रस्त विधान

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या