Home / Uncategorized / केजरीवाल यांच्या निवास प्रकरण याचिकेवर २५ ऑगस्टला सुनावणी

केजरीवाल यांच्या निवास प्रकरण याचिकेवर २५ ऑगस्टला सुनावणी

Hearing on the petition regarding Kejriwal's residence case on August 25

Hearing on the petition regarding Kejriwal’s residence case on August 25

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल(Kejriwal residence case) यांना शासकीय निवास उपलब्ध करून देण्याच्या आपने दाखल केलेल्या याचिकेवर २५ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. न्या. सचिन दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.(Kejriwal house controversy)
या याचिकेनुसार राजकीय पक्षांना निवास देण्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राष्ट्रीय पक्ष मान्यताप्राप्त असल्यास त्याचा अध्यक्ष दिल्लीत शासकीय निवास घेण्यास पात्र असतो. जर त्याच्याकडे स्वतःचे घर नसेल किंवा दुसऱ्या कोणत्याही अधिकृत पदावरून निवास नेमणूक मिळालेली नसेल तर त्याला घर द्यावेच लागते.
आपचे वकील राहुल मेहरा यांनी न्यायालयात सांगितले की, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी अधिकृत निवासस्थान मिळण्याबाबतच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत. यासाठी केंद्राकडे आम आदमी पक्षाने २० सप्टेंबर २०२३ रोजी या संदर्भात पहिला पत्रव्यवहार केला होता आणि त्यानंतर स्मरणपत्र पाठवले होते. परंतु अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.पूर्वीच्या खंडपीठाने जेव्हा पक्षाकडे कार्यालय नव्हते तेव्हा त्यांना कार्यालयासाठी जागा दिली होती. आता आम्ही फक्त निवासस्थानासाठी विनंती करत आहोत.
त्यांनी पुढे सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी ६ फ्लॅगस्टाफ रोड येथील अधिकृत निवास सोडले होते. तेव्हापासून ते मंडी हाऊसजवळील आम आदमी पक्षाच्या आमदाराच्या अधिकृत निवासस्थानी राहत आहेत.