Home / Uncategorized / Jejuri Trust :पूरग्रस्तांसाठी जेजुरी देवस्थानने १ कोटी ११ लाखांची मदत दिली

Jejuri Trust :पूरग्रस्तांसाठी जेजुरी देवस्थानने १ कोटी ११ लाखांची मदत दिली

Jejuri Trust – राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्री खंडोबा मंदिरासाठी (Khandoba temple) प्रसिद्ध असलेल्या जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थानाने (Shri Martand...

By: Team Navakal
Jejuri Trust

Jejuri Trust – राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्री खंडोबा मंदिरासाठी (Khandoba temple) प्रसिद्ध असलेल्या जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थानाने (Shri Martand Devasthan Trust) १ कोटी ११ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामधील ५१ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (Chief Minister’s Relief Fund)तर उर्वरित रक्कम पूरग्रस्तांना (Flood victims) दिली जाणार आहे.


यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, ही मदत राज्यभरातील पूरग्रस्त भागांमध्ये पोहोचवली जाणार आहे. जेथे पुरामुळे मोठे नुकसान झाले त्या गावांची निवड करून वस्तूंच्या स्वरूपात मदत वितरित केली जाणार आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीचा ५१ लाखांचा धनादेश लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis),उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत सुपूर्त केला जाणार आहे.

जेजुरी संस्थानने यापूर्वीही संकटाच्या काळात मदत पुढे केली होती. २०१९ मध्ये सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी आणि कोरोना काळात (COVID-19 pandemic)आर्थिक मदत संस्थेने केली होती. त्यात ससून रुग्णालयासाठी (Sassoon Hospital)५१ लाखांचा निधी दिला होता.


हे देखील वाचा –

SBI Report : पुढील वर्षापर्यंत महागाई खुपच कमी राहाणार !स्टेट बँकेचा अहवाल

मुंबईच्या समुद्र किनार्‍यांवरील जीवरक्षकांची संख्या वाढणार

ओला दुष्काळ’च्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान; फडणवीसांचे 2020 चे थेट पत्रच दाखवले

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या