Home / Uncategorized / Kalyan Crime : कल्याणमध्ये खुणाचा रक्तरंजित थरार

Kalyan Crime : कल्याणमध्ये खुणाचा रक्तरंजित थरार

Kalyan Crime : प्रत्येक नात्यात महत्वाचा असतो तॊ विश्वास. मग तॊ कोणत्याही नात्यातला असो. आणि एकदा का या विश्वासाला तडा...

By: Team Navakal
Kalyan Crime
Social + WhatsApp CTA

Kalyan Crime : प्रत्येक नात्यात महत्वाचा असतो तॊ विश्वास. मग तॊ कोणत्याही नात्यातला असो. आणि एकदा का या विश्वासाला तडा गेला कि उफाळून येत ते संशयाचा भूत. हा संशयचा किडा अख्खं आयुष्य पोखरून काढतो आणि मग सगळं उद्ध्वस्त करून टाकतो. असाच काहीसा प्रकार घडला तॊ कल्याणमध्ये. तिथे संशयाच्या विळख्यात अडकलेल्या नवऱ्याच्या कृत्यामुळे संसाराची राख रांगोळी झाली.

कल्याणमध्ये एक भयानक घटना समोर आली आहॆ. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला आणि त्यानंतर स्वतःच चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही घटना कल्याणच्या वरप गावातील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये घडली आहे. पितीने आपल्या पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर त्याने स्वतःवरही चाकूने वार करत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यात आरोपी गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण तालुका पोलिस ठाण्यात संतोषवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावात असलेल्या विश्वजीत प्रिअर्स या बड्या सोसायटीत आरोपी आणि त्याची पत्नी हॆ दोघेही दोन मुलांसह राहत होते. संतोष हा ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. तर त्याची पत्नी विद्या ही टाटा मोटर्समध्ये नोकरी करायची. काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून विद्या आणि संतोष यांच्यामध्ये सातत्याने वाद सुरू होते.

गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास या दोघांत पुन्हा याच कारणावरून वाद सुरु होता. त्यावेळी संतापाच्या भरात आरोपीने पत्नीवर चाकूने सपासप वार करून, गळा चिरून तिची निर्घृन हत्या केली. आणि पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडू तडफडत ठार झाली, त्यानंतर त्याने त्याच चाकूने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.


हे देखील वाचा – Delhi Airport : दिल्ली विमानतळावर तब्बल ८०० उड्डाणे उशिरा झाल्यानंतर आज नेमकी काय परिस्थिती?

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या