Home / Uncategorized / Lawyers Strike : ३ नोव्हेंबरला राज्यातील वकीलांचे एक दिवस कामबंद आंदोलन

Lawyers Strike : ३ नोव्हेंबरला राज्यातील वकीलांचे एक दिवस कामबंद आंदोलन

Lawyers Strike – राज्यात वकीलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या (Attacks On Lawyers) निषेधार्थ सोमवार ३ नोव्हेंबरला एक दिवसाचे कामबंद (one-day strike) आंदोलन...

By: Team Navakal
Lawyers Strike

Lawyers Strike – राज्यात वकीलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या (Attacks On Lawyers) निषेधार्थ सोमवार ३ नोव्हेंबरला एक दिवसाचे कामबंद (one-day strike) आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्या (Maharashtra and Goa Bar Association) नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारी वकील कोणतेही काम करणार नाहीत. या आंदोलनात महाराष्ट्र व गोव्यातील अधिकाधिक वकीलांनी सहभागी व्हावे असे आवाहनही बार असोसिएशनने केले आहे.


राज्याच्या अनेक न्यायालयांमध्ये अशील किंवा विरोधी पक्षातर्फे वकीलांवर हल्ले होत असून काही ठिकाणी ते प्राणघातकही असल्याचे बार असोसिएशनने म्हटले आहे. नुकताच अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एका वकिलावरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर वकीलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत या घटनेचा निषेध करण्यात आला.

वकील संरक्षण कायद्याचा मसुदा याआधीच तयार करण्यात आला असून तो महाधिवक्ता व राज्य सरकारकडे देण्यात आला आहे. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणीही वकीलांच्या संघटनेने केली आहे. वकीलांवरील हल्ले थांबावेत व त्यांच्या संरक्षणासाठी लवकरात लवकर कायदा (Advocate Protection Act)करावा या मागणीसाठी ३ नोव्हेंबर रोजी हे आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी वकील कोणतेही काम करणार नाहीत. जामीन अर्ज, सर्वसाधारण सुनावणी, विक्रीखत किंवा नोटरी असे कोणतेही काम या दिवशी होणार नसल्याचे वकीलांनी स्पष्ट केले आहे.


हे देखील वाचा –

तटकरेंचा शेवटचा हिशोब चुकता करणार! आमदार दळवींचा इशारा

मुंबईत कबुतरखान्यांसाठी चार नव्या जागांचा विचार

अलीगढच्या मंदिरावर हिंदूंनीच ‘आय लव्ह मोहंमद ‘ लिहिले

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या