Home / Uncategorized / Leaders Relatives as corporators : मुंबई पालिकेत राजकीय घराण्यांचे वर्चस्व ; नेत्यांचे ३० नातेवाईक सभागृहात

Leaders Relatives as corporators : मुंबई पालिकेत राजकीय घराण्यांचे वर्चस्व ; नेत्यांचे ३० नातेवाईक सभागृहात

Leaders Relatives as corporators – सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या जवळपास ४२ बडे नेते, आमदार (MLA)आणि माजी नगरसेवकांनी (former corporators)आपले नातेवाईक,...

By: Team Navakal
BMC Election Result 2026
Social + WhatsApp CTA

Leaders Relatives as corporators – सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या जवळपास ४२ बडे नेते, आमदार (MLA)आणि माजी नगरसेवकांनी (former corporators)आपले नातेवाईक, सगेसोयऱ्यांना वशिला लावून मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवून दिली होती. त्यापैकी ३० उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सभागृहात या बड्या नेत्यांच्या (Political leaders)पत्नी, मुलगा, मेव्हणा आणि जावई यांचा गोतवाळा दिसून येणार आहे.

पालिकेची निवडणूक लढविलेल्या या ४३ उमेदवारांपैकी भाजपा (BJP) नेते, आमदारांच्या १५ नातेवाईकांपैकी (Relatives)१३ उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी तिकिट दिलेल्या ६ नातेवाईकांपैकी २ उमेदवार विजयी झाले. तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढणाऱ्या उबाठाच्या नेते, आमदारांच्या १३ नातेवाईकांपैकी ८ उमेदवार विजयी झाले आहेत.

काँग्रेसच्या (Congress) नेते, आमदारांच्या ५ पैकी ४ नातेवाईकांचा आणि अजित पवार (Ajit Pawar-led Nationalist Congress)यांच्या राष्ट्रवादीमधील ३ पैकी २ नातेवाईक उमेदवार विजयी झाले आहेत. समाजवादी पार्टीचा (Samajwadi Party) एकच उमेदवार विजयी झाला आहे.

भाजपा नगरसेवक

भाजपाचे विनोद घोसाळकर ( सुनबाई ) तेजस्वी घोसाळकर

प्रवीण दरेकर ( भाऊ ) प्रकाश दरेकर

ज्ञानमूर्ती शर्मा ( पत्नी) संगीता शर्मा

जया तिवाना (मुलगा) तेजिंदर तिवाना

समीर देसाई (पत्नी ) राजुल देसाई

रघुनाथ कुलकर्णी( मुलगी) सायली कुलकर्णी

अमित साटम (मेहुणा) रोहन राठोड

किरीट सोमय्या (मुलगा) अनिल सोमय्या

सुरेखा लोखंडे (पती )रोहिदास लोखंडे

राहुल नार्वेकर (भावजय) हर्षिता नार्वेकर,( भाऊ) मकरंद नार्वेकर (बहीण) गौरवी शिवलकर असे नातेवाईक आहेत.

शिंदे गट

दिलीप लांडे (पत्नी) शैला लांडे

संजय तुर्डे (पत्नी) मीनल तुर्डे

उबाठा

सुनील प्रभू (मुलगा) अंकित प्रभू

हारून खान (मुलगी) सभा खान

विश्वनाथ महाडेश्वर (पत्नी) पूजा महाडेश्वर


श्रीकांत सरमळकर (जावई) हरी शास्त्री

संजय दिना पाटील (मुलगी ) राजुल पाटील

सुनील शिंदे (भाऊ) निशिकांत शिंदे

आशिष चेंबूरकर (पत्नी) पद्मजा चेंबूरकर

मनोज जामसुतकर (पत्नी) सोनम जामसुतकर

अजित पवार गट

नवाब मलिक (बहिण) डॉ. सईदा खान, कप्तान मलिक (सून) बुशरा मलिक

काँग्रेस

असलम शेख (बहिण) कमरजहाँ सिद्दिकी, (मुलगा) हैदरअली शेख
मोहसीन हैदर (पत्नी) मेहेर हैदर
दीपक काळे (पत्नी) आशा काळे
सपाचे युसुफ अब्राहनी ( जावई) अमरीन अब्राहनी


हे देखील वाचा –

मुंबई देशाचा अभिमान!”; महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास ट्विट

भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची २० जानेवारीला निवड होणार

अपेक्षित यश न मिळाल्याचे दु:ख! निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या