Home / Uncategorized / एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणार्लाया अटक

एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणार्लाया अटक

फरीदाबाद – यूट्यूबर (YouTuber)आणि बिग बॉस ओटीटी-२ विजेता एल्विश यादवच्या (Elvish Yadav)गुरुग्राम येथील घरावर रविवार १७ ऑगस्टला गोळीबार करण्यात आला...

By: Team Navakal
Bigg Boss OTT 2 winner Elvish Yadav’

फरीदाबाद – यूट्यूबर (YouTuber)आणि बिग बॉस ओटीटी-२ विजेता एल्विश यादवच्या (Elvish Yadav)गुरुग्राम येथील घरावर रविवार १७ ऑगस्टला गोळीबार करण्यात आला होता. हा गोळीबार करणाऱ्या आरोपी इशांत ऊर्फ ​​इशू गांधीला (Ishant alias Ishu Gandhi) फरीदाबाद गुन्हे शाखेने (Faridabad crime branch) अटक केली.

इशांतला पकडताना पोलिसांची त्याच्याबरोबर चकमक उडाली. या चकमकीत त्याच्या पायात गोळी लागली. त्याला पकडल्यानंतर उपचारासाठी (Treatment)रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एल्विशच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर, सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage)तपासण्यात आले. त्यामध्ये सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास तीन दुचाकीस्वारांनी एल्विशच्या घरावर तब्बल १२ गोळ्या (12 rounds at Elvish’s house)झाडल्याचे दिसते. हल्ल्यावेळी एल्विश घरी नव्हता. फक्त त्याची आई सुषमा यादव, वडील रामावतार घरी होते. हल्ल्याची जबाबदारी कुख्यात हिमांशू भाऊ टोळीने (Himanshu Bhau gang) एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्वीकारली होती. या टोळीतील नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांनी एल्विशवर बेटिंग अॅपचा प्रचार करून अनेकांचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या