Home / Uncategorized / Yasin Malik : मनमोहन सिंगांनी माझे आभार मानले! यासिन मलिकचा दावा

Yasin Malik : मनमोहन सिंगांनी माझे आभार मानले! यासिन मलिकचा दावा

Yasin Malik : जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) लिबरेशन फ्रंटचा दहशतवादी (Terrorist) यासिन मलिकने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (former Prime...

By: Team Navakal
Yasin Malik

Yasin Malik : जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) लिबरेशन फ्रंटचा दहशतवादी (Terrorist) यासिन मलिकने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (former Prime Minister Dr. Manmohan Singh.) यांच्याबद्दलच्या एका सनसनाटी दावा करून खळबळ उडवून दिली आहे. २००६ मध्ये पाकिस्तानात लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईदच्या (Lashkar-e-Taiba founder Hafiz Saeed)भेटीनंतर डॉ. सिंग यांनी माझे वैयक्तिकरित्या आभार मानले होते, असा दावा मलिकने केला आहे. सध्या मलिक दहशतवाद्यांना पैसे पुरवण्याच्या प्रकरणात जन्मठेप भोगत आहेत.

दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) २५ ऑगस्ट रोजी दाखल केलेले मलिकचे प्रतिज्ञापत्र भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर हे प्रतिज्ञापत्र शेअर केले आहे. ते लिहितात, टेरर-फंडिग प्रकरणात आजन्म कारावास भोगत असलेल्या यासिन मलिकने खळबळजनक दावा केला आहे. त्याने म्हटले आहे की, २००६ मध्ये त्याने स्वतःहून दहशतवाद्यांची भेट घेतली नव्हती. पाकिस्तानसोबत (Pakistan)सुरू असलेल्या गुप्त शांतता वाटाघाटीच्या अनुषंगाने वरिष्ठ भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मी ही भेट घेतली होती.

मलिकच्या दाव्यानुसार, २००५ मध्ये पाक दौऱ्याआधी आयबीचे तत्कालीन विशेष संचालक व्ही. के. जोशी यांनी दिल्लीत माझी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी या दौऱ्याचा वापर केवळ पाकिस्तानी राजकारण्यांसोबत गाठीभेटीपुरता मर्यादित न ठेवता सईदसारख्या दहशतवाद्यांशीही चर्चा करावी. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शांतता प्रयत्नांचाच हा एक भाग असेल, असे मला सांगितले होते.
पाकसोबतच्या शांतता चर्चेत दहशतवादी नेते सहभागी होत नाहीत, तोपर्यंत या चर्चेला काही अर्थ नाही, असेही मला स्पष्टपणे सांगण्यात आले होते. याच आग्रहामुळे मी पाकिस्तानात एका कार्यक्रमात सईद आणि युनायटेड जिहाद कौन्सिलच्या इतर नेत्यांच्या भेटीसाठी तयार झालो होतो, असा दावा त्याने केला आहे. दरम्यान, नंतरच्या काळात मलिकची पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी जवळीक असल्याचा पुरावा म्हणून न्यायालयापुढे या भेटीचा उल्लेख करण्यात आला आहे. मलिकने आपल्या प्रतिज्ञापत्रात या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख एक विश्वासघात, असा केला आहे.


हे देखील वाचा – 

 सरकारचा ‘तो’ निर्णय ठरला वादग्रस्त, राज्यातील 1.8 लाख डॉक्टरांचा संप

महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये मतदार यादीत घोटाळा संगणकाच्या मदतीने फेरफार! राहुल गांधींनी पुरावे दिले

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; 2 महिन्यात करा ‘हे’ काम; अन्यथा पैसे बंद

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या