Home / Uncategorized / Marathi Vs Hindi : तुम्ही लोक कचरा आहात..कल्याणमध्ये पुन्हाएकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटला..

Marathi Vs Hindi : तुम्ही लोक कचरा आहात..कल्याणमध्ये पुन्हाएकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटला..

Marathi Vs Hindi : महाराष्ट्रात मराठी(Marathi) विरुद्ध हिंदी (Hindi) असा वाद अनेकदा पेटलेला पाहायला मिळाला आहे. हा वाद अनेकदा विकोपाला...

By: Team Navakal
Marathi Vs Hindi

Marathi Vs Hindi : महाराष्ट्रात मराठी(Marathi) विरुद्ध हिंदी (Hindi) असा वाद अनेकदा पेटलेला पाहायला मिळाला आहे. हा वाद अनेकदा विकोपाला जाताना देखील आपण पहिला आहे. अश्याच एका वादाची पुनरावृत्ती कल्याणमध्ये(Kalyan) झाल्याची घटना समोर आली आहे. मराठी(Marathi) विरुद्ध अमराठी असा वाद कल्याणमध्ये पेटला. हि घटना डी-मार्टमध्ये घडली असून एका अमराठी महिलेने मुजोरी केल्याचे समोर आले आहे. या वादामुळे कल्याणमध्ये(Kalyan) संतापाची लाट उसळली आहे.

कल्याण पश्चिमेतील डी-मार्टमध्ये हा वाद झाला. काउंटरवर खरेदीसाठी आलेल्या एका महिलेने कर्मचार्‍यांशी हा वाद घातला. ती म्हणाली “माझ्याशी मराठीत नाही, हिंदीत बोला” अश्या प्रकारची मागणी त्या महिलेने केली. मात्र कर्मचाऱ्यांनी “मला मराठी येते, मी हिंदीत बोलणार नाही” असे ठाम उत्तर महिलेला दिले. यानंतर या महिलेने यावर गोंधळ घायाला सुरवात केली. महिलेने त्या कर्मचाऱ्याला खडे बोल सूनवायला सुरवात केली. ती पुढे म्हणाली तुम्ही मराठी लोक कचरा आहात, आमच्या जीवावर जगता, आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकून आहे, तिने असे बोलताच वातावरण तापले. या वेळी या घटनेची माहिती त्या ठिकाणी उपस्थित असणार्‍या इतर मराठी ग्राहकांनी या महिलेला विरोध करत ही माहिती मनसे कार्यकर्त्यांना दिली.

मनसे कार्यकर्त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत धडा शिकवला. मनसे कार्यकर्त्यांनी डी मार्टच्या बाहेर त्या महिलेला, तिच्या मुलाला आणि सोबत असलेल्या लोकांना जाब विचारत आक्रमकतेचा भूमिका घेतली. मनसेच्या या भूमिकेनंतर डी मार्ट परिसरात अतिशय तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले होते. अखेर मनसे कार्यकर्त्यांनी त्या महिलेला माफी मागितल्यानंतरच बाहेर जाण्यास सांगितले.

महाराष्ट्रातराहूनही मराठी लोकांबद्दल उलटसुलट बोलणाऱ्या, मराठी भाषेत संवाद साधण्यास नकार देणाऱ्या या महिलेचा मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला, तिच्याकडून माफीची मागणी देखील करण्यात आली. अखेर माफी मागितल्यानंतर मराठी विरुद्ध हिंदी वाद आटोक्यात आला! सध्या खडकपाडा पोलिसांत याविषयी तक्रार दाखल करण्यात आलेय.


हे देखील वाचा –

Pakistan VS Afghanistan: तालिबानचा पाकिस्तानला कठोर इशारा..एकमेकांविरोधात मोठे दावे..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या