Home / Uncategorized / Montha Cyclone Maharashtra Weather : मोंथा चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला फटका?

Montha Cyclone Maharashtra Weather : मोंथा चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला फटका?

Montha Cyclone Maharashtra Weather : पावसाळा गेला तरी पाऊस काही थांबायचं नाव नाही घेत आहे. यात पूर्ण दिवाळी सुद्दा सरली...

By: Team Navakal
Montha Cyclone Maharashtra Weather

Montha Cyclone Maharashtra Weather : पावसाळा गेला तरी पाऊस काही थांबायचं नाव नाही घेत आहे. यात पूर्ण दिवाळी सुद्दा सरली तरी देखील पावसाची रीप रीप काही थांबली नाही. त्यात नव नवीन वादळांचा समावेश आहेच. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर देखील दिसून येत आहे शिवाय यामुळे समुद्रही चांगलाच खवळला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने देवगड बंदरात शेकडो नौका ह्या सुरक्षित ठिकाणी दाखल करण्यात आल्या आहेत.

समुद्रातील मासेमारी पूर्णतः ठप्प करण्यात आली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी हे दोन्ही समुद्र (Arabian Sea)सध्या खवलेले असून याचा मोठा परिणाम मासेमारीच्या व्यवसायावर झाला आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्यामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी या देवगड बंदरात सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत.

अरबी समुद्रातील वादळांमुळे मासेमारीसाठी गेलेल्या तीन बोटींचा संपर्क तुटला असल्याची माहिती आहे. उरणमधील न्हावा शेवा गावातील या तीन बोटी आहेत. यावर जवळपास ५० खलाशी आहेत. कोस्ट गार्ड आणि बोट मालकांशी बेपत्ता बोटींचा संपर्क होत नसल्याने ५० खलाशांची चिंता सध्या त्यांच्या कुटुंबीयांना लागून राहिली आहे.

एकीकडे मोंथा वादळाचा फटका आणि दुसरीकडे कोकण किनारपट्टीला पावसाचा असलेला अंदाज लक्षात घेत समुद्र खवळण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया ही जलवाहतूक बंद ठेवणायचे निर्णय घेण्यात आले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि अस्थिर अश्या हवामानामुळे समुद्र खवळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणताही चुकीचा प्रकार घडू नये याकरिता खबरदारी म्हणून जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून घेण्यात आले आहेत.

मालदार कॅप्टन ही बोट तात्पुरत्या स्वरूपात सुरू राहणार असलायची माहिती आहे. मात्र इतर बोटी बंद असणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या तीन नंबरच्या इशाऱ्यानंतर अलिबाग, मुरुड, काशीद, रेवदंडा आणि उरण परिसरातील सुद्धा सर्व मच्छिमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यावरच असल्याची माहिती आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणातील पावसाचा मुक्काम मात्र वाढला आहे. याचा परिणाम काजू बागांवर देखील झाला आहे. काही ठिकाणी काजूला मोहोर यायला सुरवात झाली होती, मात्र; पाऊस लांबल्याने तो मोहोर गळून पडला आहे. तसेच पाऊस पडत असल्याने काजूवर बुरशीजन्य रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता शेतकऱ्याने वर्तवली आहे. अधिकच्या पावसामुळे काही ठिकाणी मर रोंग देखील काजूच्या झाडाला लागून काजूची झाड सुकून जात आहेत.

जळगाव जिल्ह्यातील गिरणा परिसरात अवकाळीचा जोर कायम असून सलग चौथ्या दिवशीहि पावसाने हजेरी लावली आहे. भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव यांसारख्या तालुक्यांत मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सातगाव डोंगरी आणि अजिंठा डोंगर परिसरात झालेल्या पावसामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी पिंपरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उतावळी नदीला पूर आल्यामुळे नागरिकांनी एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतर करण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला.

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, शिंदाड, लोहारा, कुऱ्हाड आणि वरखेडी या गावांना देखील पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. या सततच्या पावसामुळे केळी, मका, कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.


हे देखील वाचा – Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच..अपघातात दोन जखमी!

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या