Home / महाराष्ट्र / MP Sanjay Raut : मनसेला सोबत घेण्यास सपकाळांचा विरोध? खा.राऊतांचे पक्षश्रेष्ठींना पत्र

MP Sanjay Raut : मनसेला सोबत घेण्यास सपकाळांचा विरोध? खा.राऊतांचे पक्षश्रेष्ठींना पत्र

MP Sanjay Raut – मनसेला (MNS) महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) समाविष्ट करण्याच्या चर्चेत उबाठा आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे चित्र...

By: Team Navakal
MP Raut Slams Jay Shah

MP Sanjay Raut – मनसेला (MNS) महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) समाविष्ट करण्याच्या चर्चेत उबाठा आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे चित्र आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) यांनी मनसेला सोबत घेण्याच्या मुद्यावर कथितपणे नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे उबाठा खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध थेट पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने (Congress)तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राऊतांच्या पत्रात सपकाळ यांनी मनसेच्या आघाडीतील समावेशास विरोध केला असल्याचे नमूद केले आहे. मात्र, काँग्रेस नेतृत्व सपकाळ यांच्या भूमिकेला पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेस मते, राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आघाडीमध्ये समाविष्ट केल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार दूर होऊ शकतात. हे मतदार काँग्रेसचे पारंपरिक आधारस्तंभ मानले जातात. हा मतदार दूर करणे काँग्रेसला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परवडणारे नाही.

उल्लेखनीय बाब म्हणजे मनसे व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवार व बुधवार असे सलग २ दिवस राज्य निवडणूक आयोगाच्या (Election Commission)अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. विरोधकांच्या या शिष्टमंडळात सुरुवातीला हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव होते. पण ऐनवेळी त्यांना दिल्लीला जावे लागल्यामुळे त्यांना या शिष्टमंडळासोबत जाता आले नाही. पण आता त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागे संजय राऊत यांचे पत्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण सपकाळ यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.

सपकाळ म्हणाले की, मी सुद्धा या शिष्टमंडळासोबत जाणार होतो. पण मला ऐनवेळी दिल्लीतून (Delhi)बोलावणे आल्यामुळे मला तिकडे जावे लागले. मी पक्षाच्या कामासाठी दिल्लीला गेलो. आत्ता कुणाला आघाडीत घ्यायचे किंवा कुणाला घ्यायचे नाही याचा निर्णय दिल्लीत होईल. संजय राऊत आमच्या इंडिया आघाडीचे (INDIA bloc)नेते आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधण्यास मला कोणतीही समस्या नाही.


हे देखील वाचा 

३३ टक्के गुण; दहावी- बारावीला उत्तीर्ण होणार ! ‘या’ राज्यात नवा नियम लागू

कैद्याला फाशी ऐवजी विषारी इंजेक्शन केंद्राचा पर्याय देण्यास विरोध का ? सुप्रीम कोर्टाचा सवाल

हिंदी फलक , चित्रपट, गाण्यांवर तामिळनाडूत बंदीचे विधेयक येणार

Web Title:
संबंधित बातम्या