Home / Uncategorized / Mumbai ED raids: मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीची मुंबईत ८ ठिकाणी छापेमारी

Mumbai ED raids: मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीची मुंबईत ८ ठिकाणी छापेमारी

Mumbai ED raids: मुंबईत सक्तवसुली संचलनालय (ED) ने आज मनी लाँडरिंग प्रकरणी (money laundering case) तब्बल ८ ठिकाणी छापेमारी केली....

By: Team Navakal
Mumbai ED raids
Social + WhatsApp CTA

Mumbai ED raids: मुंबईत सक्तवसुली संचलनालय (ED) ने आज मनी लाँडरिंग प्रकरणी (money laundering case) तब्बल ८ ठिकाणी छापेमारी केली. ही कारवाई ड्रग (Drug) तस्करी नेटवर्कशी संबंधित असल्याची माहिती आहे.

मुंबई झोनल कार्यालयाने पीएमएलए २००२ च्या कायद्याअंतर्गत ही कारवाई केली असून अधिकाऱ्यांनी सांगितले की, फैसल जावेद शेख आणि त्याची सहकारी अल्फिया फैसल शेख यांनी ड्रग्जच्या अवैध नेटवर्कद्वारे जमवलेल्या संपत्ती जप्त करण्यासाठी व मनी लाँडरिंगचा माग काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या प्राथमिक चौकशीत असे समोर आले की, फैसल जावेद शेख सलीम डोलाकडून एमडी ड्रग खरेदी करत होता. सलीम डोला हा ड्रग तस्कर असून त्याला मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. डोला अंमली पदार्थाच्या तस्करीत आणि मोठ्या आर्थिक घडामोडींमध्ये महत्त्वाचा सिंडेकेट आहे. एनसीबीने त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे.

ईडीची आजची कारवाई ही ड्रग संदर्भातील मोठ्या मनी लाँडरिंगवरील कारवाई म्हणून गणली जात आहे. या कारवाईतून मुंबई आणि संबंधित भागातील ड्रग सिंडिकेट चालवणाऱ्यांच्या आर्थिक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल ईडीने दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, हरियाणा आणि मुंबई येथील १५ ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. याठिकाणांवरून ड्रग सिंडिकेटला तांत्रिक मदत मिळत असल्याचा दावा ईडीने केला.


हे देखील वाचा –

अजित पवारांनी साप पोसलेत ! मनोज जरांगेंची विखारी टीका

स्वसंरक्षणासाठीच अक्षय शिंदेचा एनकाऊंटर पोलिसांना न्यायिक समितीने क्लीन चीट दिली

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या