Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावरती गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने तीन चारचाकी वाहनांना आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या अपघातामुळे दोन जण जखमी झाले असून या अपघातामुळे काही तासांसाठी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
या अपघातात तिन्ही चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे असल्याची माहिती आहे. या अपघातात स्विफ्ट डिझायर कारमधून प्रवास करणारे दोघेजण जखमी झाले असलायची माहिती आहे.
खेड तालुक्यातील वेरळ इथे गेली अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्ग हा बऱ्याच काळापासून अपूर्ण अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मार्गावर याआधीही छोटे-मोठे अनेक अपघात झाले आहे तरी देखील अद्याप महामार्ग विभागाकडून या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले जात नसल्याचे निदर्शनात येत आहे.
या अपूर्ण कामामुळे पुन्हा एकदा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना यासगळ्याचा फुकटचा त्रास सोसावा लागला आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने वेगात जाणारा कंटेनर हा भोस्ते घाट उतरून आल्यानंतर वेरळ गावातील महामार्गावरील डायव्हर्झन इथे आला होता त्यानंतर त्याने सगळ्यात आधी समोर निघालेल्या टाटा नेक्सन कारला पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर पुढे असलेल्या दुचाकीला पाठीमागून धडक बसली. तसेच समोरून कंटेनरच्या दिशेने येणाऱ्या महिंद्रा पिकअपला या भरधाव कंटेनरने धडक दिली. त्यानंतर मुंबईच्या दिशेने समोर निघालेल्या स्विफ्ट डिझायर कार वरतीच हा कंटेनर पलटी झाला. यामध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
सुदैवाने या कारमधून प्रवास करणारे दोघेहि जण बचावले असले तरीही त्यांना यामध्ये दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूकडून मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. तर महामार्गावर या कंटेनर ट्रक मधील केमिकल सदृश्य द्रव्यदेखील सर्वत्र पसरले होते. या अपघाताची माहिती मिळतात पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली आणि काही तासांनी वाहतूक सुरळीत केली.
हे देखील वाचा – Petrol And Diesel Price in Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट..









