नवी दिल्ली – उपराष्ट्रपती (Vice President)पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (National Democratic Alliance) उमेदवार उद्या जाहीर केला जाणार आहे . त्यासाठी उद्या संध्याकाळी ६ वाजता भाजपा संसदीय मंडळाची(BJP Parliamentary Board) बैठक होणार असून या बैठकीतच उमेदवाराचे नाव अंतिम होण्याची शक्यता आहे.
भाजपा आपल्या विचारसरणीशी निष्ठावान (leader loyal to its ideology)असलेल्या अनुभवी कार्यकर्त्याला उमेदवारीदेऊ शकते. त्यात कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत (Karnataka Governor Thawarchand Gehlot,) हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. गेहलोत यांनी राज्यसभेत सभागृहनेते, केंद्रीय मंत्रीपद अशी महत्त्वाची पदे भूषवली असून ते संसदीय मंडळाचे सदस्यही राहिले आहेत.
तर दुसरे नाव सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर (Sikkim Governor Om Mathur)यांचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi)गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते गुजरातचे निवडणूक प्रभारी होते. माथूर हे मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah.)यांचे विश्वासू मानले जातात. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारकही (RSS pracharak)राहिले आहेत.निवडलेला उमेदवार २१ ऑगस्ट रोजी नामांकन दाखल करणार आहे. त्या वेळी एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील.
दरम्यान, इंडिया आघाडीदेखील (INDIA bloc is)उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर चर्चा करण्यासाठी सोमवार, १८ ऑगस्ट रोजी बैठक घेऊ शकते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)हे या संदर्भात आघाडीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करत आहेत.