Home / Uncategorized / School: राज्यातील सर्व शाळांमध्ये आता ऑनलाईन हजेरी

School: राज्यातील सर्व शाळांमध्ये आता ऑनलाईन हजेरी

School- आता राज्यातील सर्व शाळांनी (school) ऑनलाईन हजेरी प्रणाली स्वीकारण्याची तयारी सुरू केली आहे . तशी सूचना प्राथमिक, माध्यमिक व...

By: Team Navakal
school
Social + WhatsApp CTA

School- आता राज्यातील सर्व शाळांनी (school) ऑनलाईन हजेरी प्रणाली स्वीकारण्याची तयारी सुरू केली आहे . तशी सूचना प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.संचालनालयाने एक परिपत्रक काढत नव्या सूचनांनुसार प्रत्येक शाळेने व्हीएसके प्रणालीचा दैनंदिन वापर करुन विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची उपस्थिती नोंदवणे बंधनकारक केले आहे.

यापुढे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदीत कोणतीही तांत्रिक त्रुटी किंवा विलंब होऊ नये यासाठी शिक्षकांनी गुगल प्ले स्टोअरवरील महास्टुडंट अ‍ॅप हे अधिकृत अ‍ॅप डाऊनलोड करुन त्यावर शाळेचा यूडायस क्रमांक व प्राथमिक माहिती नोंदवावी असे कळवण्यात आले आहे. अ‍ॅपमध्ये शाळेची माहिती प्रदर्शित झाल्यानंतर ती अचूक असल्याची खातरजमा करुन पुढील टप्पा पूर्ण करावयाचा आहे. त्यानंतर संबधित वर्ग शिक्षकांनी स्वतःचा शालार्थ आयडी प्रविष्ट करुन माहिती योग्य असल्याची पडताळणी करणे आवश्यक असल्याचेही या परिपत्रकात म्हटले आहे.शाळांमधील हजेरी नोंदीची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी केंद्रप्रमुखांनी दररोज आढावा घेणे बंधनकारक असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवताना विद्यार्थी उपस्थिती या टॅबवर क्लिक करुन प्रत्येक विद्यार्थ्याची उपस्थिती,
अनुपस्थितीची नोंद करायची आहे.एका शिक्षकाकडे एकापेक्षा जास्त इयत्तेची जबाबदारी असल्यास प्रत्येक वर्गासाठी ही प्रक्रिया स्वतंत्रपणे करावी लागेल.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

 सातारा जिल्ह्यात भाजपची कोंडी!आजी- माजी पालकमंत्री एकत्र

बिहारमधील पराभव जिव्हारी लागला! काँग्रेसने 7 नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या