Online Gaming Ban: सरकारने काही दिवसांपूर्वीच आणलेल्या ऑनलाइन गेमिंग बंदी संदर्भातील कायद्यामुळे अनेक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आता या कायद्याला पहिले कायदेशीर आव्हान मिळाले आहे.
ऑनलाइन गेमिंग कंपनी A23 ने ऑसरकारने घातलेल्या बंदीला कर्नाटक उच्च न्यायालयातआव्हान दिले आहे. यामुळे, ऑनलाइन गेमिंग कायद्याविरोधात दाखल झालेली ही पहिलीच याचिका आहे.
संसदेने ‘Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025’ विधेयक मंजूर केल्यानंतर रिअल-मनी ऑनलाइन गेमिंगला मोठा धक्का बसला. या कायद्याने ऑनलाइन पैसे असलेल्या सर्व खेळांवर बंदी घातली आहे.
A23 ने कोर्टात काय म्हटले?
A23 ने कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, हा कायदा ‘कौशल्याच्या ऑनलाइन खेळांना गुन्हेगार ठरवतो’, ज्यामुळे अनेक गेमिंग कंपन्या एका रात्रीत बंद होतील.
A23 हे रमी आणि पोकरसारखे खेळ ऑफर करते. A23 ने आपल्या याचिकेत पुढे म्हटले आहे की, हा नवीन कायदा रमी व पोकरसारख्या कौशल्याच्या खेळांना लागू केल्यास तो असंवैधानिक घोषित केला जावा.
इतर गेमिंग कंपन्यांची भूमिका
Dream11 आणि Gameskraft सारख्या मोठ्या कंपन्यांनी मात्र नवीन ऑनलाइन गेमिंग कायद्याला आव्हान देणार नसल्याचे जाहीर केले आहे. आता A23 ने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
दरम्यान, विधेयक मंजूर झाल्यानंतर Dream11, My11Circle, WinZO, Zupee आणि PokerBaazi यांसारख्या मोठ्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मने त्यांचे रिअल-मनी गेमिंग बंद केले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Maratha Reservation: ‘मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नाही’; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच केले
Mohan Bhagwat: ‘प्रत्येक भारतीय कुटुंबात तीन मुले हवीत’, मोहन भागवत यांचे मोठे विधान