Pakistan VS Afghanistan : पाकिस्तान-अफगाणिस्तान(Pakistan VS Afghanistan) सीमेवर रात्रभर मोठा संघर्ष झाला. यात २३ पाकिस्तानी सैनिक तर २००हुन अधिक तालिबानी सैनिकांचा मृत्यू झाला. रविवारी पाकिस्तानी(Pakistan) सैन्याने याबाबत हा दावा केला आहे. दुसरीकडे या विरुद्ध तालिबानने(Afghanistan)त्यांच्या कारवाईत ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा केलाय. या हिंसक युद्धानंतर दोन्ही देशात तणाव आणखी वाढला आहे. कारण दोन्ही देशांनी परस्परांवर सीमापार हल्ले केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या दाव्यांवर विश्वास ठवणे कठीण आहे. याबाबतची प्रचिती भारताला भारत पाकिस्तान युद्धात देखील आली होती. कारण पाकिस्तानी आर्मीची प्रोपेगेंडा मशीन ISPR ने देखील ऑपरेशन सिंदूरवेळी याच प्रकारचे अनेक खोटे दावे केले होते. तालिबानने अंगूर अड्डा, बाजौर, कुर्रम, दिर आणि चितरल (खैबर पख्तूनख्वा प्रांत) बरामचा (बलूचिस्तान) येथील पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केल्याचे समोर आले. या ठिकाणी अफगाण तालिबानकडून पाकिस्तानला चांगलंच उत्तर देण्यात आल.
पाकिस्तानचा नेमका दावा काय?
१९ अफगाण सैन्य चौक्या आणि दहशतवादी तळ ताब्यात घेतल्याच पाकिस्तानी सैन्याने दावा केला आहे. अफगाण तालिबानच्या कारवाईला दिलेले हे चोख प्रत्युत्तर आहे, असंहि पाकिस्तानच म्हणणं आहे. आमच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर ३० सैनिक जखमी आहेत, असा दावा काबूलने केलाय. ११ आणि १२ ऑक्टोंबरच्या रात्री अफगाण तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान या दोघांनी मिळून पाक-अफगाण सीमेवर मोठा हल्ला केला होता. आम्ही कुठलीही चिथावणीखोर कृती न केल्याचा दावाही पाकिस्तानी सैन्याने केला आहे.
‘दहशतवाद्यांच्या नीच कारस्थानाचा हा भाग’
पाकिस्तानी आर्मीनुसार, हे सगळे भ्याड हल्ले आहेत. अफगाण तालिबानने सीमेवर गोळीबार आणि छोट्या प्रमाणात जमिनी हल्ले केल्याचा दावाही पाकिस्तानी लष्कराने केला आहे. सीमा क्षेत्र अस्थिर करणं आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत राहणं हा या हल्ल्यांमागचा मूळ उद्देश आहे. पाकिस्तानी आर्मीनुसार, दहशतवाद्यांच्या नीच कारस्थानाचा हा एक भाग आहे.
तालिबानचा पाकिस्तानला इशारा
तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाण सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सकाळी हल्ल्यांची माहिती दिली. आमच्या सैन्याने प्रत्युत्तराची लढाई लढताना यशस्वी ऑपरेशन केल असा दावा तालिबानने केला आहे. “पाकिस्तानने पुन्हा अफगाण सीमेच उल्लंघन केलयास, आमचं सशस्त्र सैन्य पूर्णपणे सज्ज आहे, याच कठोर प्रत्युत्तर मिळेल” असा तालिबानने पाकिस्तानला इशारा दिला आहे.
हे देखील वाचा –