Home / Uncategorized / PM Modi On INS Vikrant : पंतप्रधान मोदींनी केली आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी, पंतप्रधान मोदींनी केले सैन्याचे कौतुक..

PM Modi On INS Vikrant : पंतप्रधान मोदींनी केली आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी, पंतप्रधान मोदींनी केले सैन्याचे कौतुक..

PM Modi On INS Vikrant : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आयएनएस विक्रांतवरील नौदल कर्मचाऱ्यांसोबत (INS Vikrant) मोठ्या उत्सहात...

By: Team Navakal
PM Modi On INS Vikrant

PM Modi On INS Vikrant : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आयएनएस विक्रांतवरील नौदल कर्मचाऱ्यांसोबत (INS Vikrant) मोठ्या उत्सहात दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला, नौसैनिकांसोबत गप्पा देखील मारल्या, गाणी गायली, त्यांना मिठाई खायला दिली आणि रात्रीचे जेवण सुद्धा केले. हा समारंभ ऐतिहासिक असल्याचे देखील ते म्हणाले.

पुढे ते म्हणतात, ऑपरेशन सिंदूर (operation sindoor)दरम्यान तिन्ही दलांमधील कमालीच्या समन्वयामुळे पाकिस्तानला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षा दलांच्या शौर्याचे आणि दृढनिश्चयाचे कौतुक केले आहे. आयएनएस विक्रांत ही केवळ एक युद्धनौका नाही तर ती २१ व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेची साक्ष आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणतात की आयएनएस विक्रांत हे भारताच्या सशस्त्र दलांच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे आणि ‘आत्मनिर्भर भारत’चे एक उत्तुंग प्रतीक आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान तिन्ही दलांमधील असाधारण समन्वयामुळे पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली, असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्या भाषणात, पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत माओवादी हिंसाचारापासून मुक्ततेच्या उंबरठ्यावर आहे आणि “हे स्वातंत्र्य आपले दरवाजे ठोठावत आहे”. पूर्वी, १२५ जिल्हे माओवादी दहशतीच्या विळख्यात होते परंतु आता ते फक्त ११ जिल्हे राहिले आहेत. “९०% यश मिळाले असले तरी, मला विश्वास आहे की पोलिस दल माओवादी हिंसाचार पूर्णपणे नष्ट करण्यात यशस्वी होतील,” असे देखील ते म्हणाले.

भारताला जगातील सर्वोच्च संरक्षण निर्यातदारांपैकी एक बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की २०१४ पासून आमच्या शिपयार्ड्सनी ४० हून अधिक युद्धनौका आणि पाणबुड्या बांधल्या आहेत. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ब्रह्मोस हे नाव काहींच्या मनात भीती निर्माण करते आणि आता अनेक देश ही क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास उत्सुक आहेत. “आयएनएस विक्रांतवर काल घालवलेली रात्र शब्दात मांडणे कठीण आहे. तुम्ही सर्वजण किती प्रचंड ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले आहात ते मी पाहिले. काल जेव्हा मी तुम्हाला देशभक्तीपर गाणी गातांना पाहिले आणि तुम्ही तुमच्या गाण्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरचे वर्णन कसे केले, तेव्हा युद्धभूमीवर उभे राहून जवानाला होणारा अनुभव शब्दांत पूर्णपणे व्यक्त करता येत नाही,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


हे देखील वाचा 

Heavy Rain In Chennai : ऐन दिवाळीत चेन्नईत पावसाची हजेरी..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या