Home / महाराष्ट्र / Praniti Shinde : डील, डावपेच आणि दुहेरी खेळ! प्रणिती शिंदेंवर सुजात आंबेडकरांचा थेट आरोप..

Praniti Shinde : डील, डावपेच आणि दुहेरी खेळ! प्रणिती शिंदेंवर सुजात आंबेडकरांचा थेट आरोप..

Praniti Shinde : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप केले...

By: Team Navakal
Praniti Shinde
Social + WhatsApp CTA

Praniti Shinde : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. सुजात आंबेडकर यांनी थेट दावा करत म्हटले की, महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यासाठी त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आधीच “डील” झालेली आहे.

आपल्या आरोपांना अधिक धार देताना सुजात आंबेडकर म्हणाले की, सध्याच्या निवडणूक लढतीत आमच्या विरोधात उघडपणे भाजप आहेच; मात्र दुसऱ्या बाजूला अप्रत्यक्षपणे भाजपच काम करत आहे. “प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करत आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. भाजप आणि काँग्रेसमधील या कथित अंतर्गत समझोत्यामुळेच निवडणुकीत संभ्रमाची स्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी सूचित केले.

या संदर्भात बोलताना सुजात आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. “जर आमच्या विरोधात आरएसएसने थेट निवडणूक लढवली असती, तरी आम्ही त्यांनाही पराभूत केले असते,” असे ते म्हणाले. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, विरोधक एकच असून वेगवेगळ्या स्वरूपात तेच राजकारण खेळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सुजात आंबेडकर यांनी दावा केला की, प्रणिती शिंदे या सद्याच्या निवडणुकांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या आणि ऑक्टोबर महिन्यात हा प्रवेश निश्चित होता. आपले म्हणणे अधिक स्पष्ट करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदे यांना थेट भाजपमध्ये प्रवेश न करता थांबण्याचा सल्ला दिला होता. “नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या तीन महत्त्वाच्या निवडणुका येत असल्यामुळे तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच राहा आणि नियोजनबद्ध पद्धतीने भाजपचे उमेदवार निवडून येण्यासाठी मदत करा,” असे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या कथित ‘सेटिंग’मुळेच सध्याच्या राजकीय घडामोडी संशयास्पद वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुजात आंबेडकर यांनी या आरोपांमधून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमधील काही नेत्यांमध्ये पडद्यामागे चालणाऱ्या राजकीय व्यवहारांकडे बोट दाखवले आहे. त्यांच्या मते, जनतेसमोर विरोधक म्हणून भासणारे काही चेहरे प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी काम करत असून, त्यामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र असलेल्या सुजात आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. आपल्या आरोपांना अधिक बळ देताना सुजात आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप हे वरवर एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याचे भासवत असले, तरी प्रत्यक्षात त्यांची नाती खूप खोलवर आहेत. “या लोकांची व्यावसायिक हितसंबंध, सामाजिक संबंध आणि व्यक्तिगत जवळीक ही सर्वश्रुत आहे,” असा आरोप त्यांनी केला. उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, दोन ते तीन महिन्यांपूर्वी सुशील कुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफच्या लग्नसमारंभात शरद पवार, गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस हे तिघेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ही उपस्थिती केवळ सामाजिक नसून राजकीय आणि आर्थिक संबंधांचे द्योतक असल्याचे त्यांनी सूचित केले.

सुजात आंबेडकर यांनी पुढे अधिक तीव्र शब्दांत टीका करत म्हटले की, भाजप आणि काँग्रेस हे जणू निवडणुकीपुरतेच एकमेकांविरोधात उभे ठाकतात. “हे दोन्ही पक्ष ईव्हीएमवर आणि रस्त्यावर लढायचं नाटक करतात. प्रत्यक्षात यांचे व्यवसाय एक, यांची लग्नं एक, यांचे नातेगोते एक आणि यांचे सर्व व्यवहारही एकसारखेच आहेत,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी असेही म्हटले की, “प्रणिती ताईंनी भाजपमध्ये प्रवेश केला, की मग पक्षही एकच राहील,” असा त्यांचा दावा आहे.

याच पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांनी मतदारांना थेट आवाहन करत म्हटले की, काँग्रेसच्या नादाला लागू नका. “तुम्ही काँग्रेसला मत दिलं, म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपलाच मत दिल्यासारखं आहे,” असे स्पष्ट विधान त्यांनी केले. मात्र, त्यांनी हेही नमूद केले की, ते अख्ख्या महाराष्ट्रातील काँग्रेसबद्दल बोलत नसून विशेषतः सोलापूरच्या परिस्थितीबाबत हे वक्तव्य करत आहेत.

“सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार या प्रत्यक्षात भाजपसाठी काम करतात, हे आता संपूर्ण जगाला कळून चुकले आहे,” असा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोलापूरसह राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. संबंधित नेते आणि पक्षांकडून या आरोपांवर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा – Famous Temples in Maharashtra : एकदा महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांना भेट द्यायलाच हवी! अध्यात्म आणि ऐतिहासिक वारशाचा अनमोल ठेवा

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या