Narendra Maharaj: दक्षिण पीठाचे रामानंदाचार्य नरेंद्र महाराज (Ramanandacharya Narendra Maharaj) यांनी हिंदू धर्म टिकावण्यासाठी हिंदू (Hindu) समाजाने किमान दोन मुले जन्माला (Give birth to two children) घालण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जर हिंदूंची लोकसंख्या कमी होत राहिली तर भारतात हिंदू बहुसंख्य राहणार नाहीत.
नरेंद्र महाराज म्हणाले की,भारतामध्ये बहुसंख्य हिंदू लवकरच संपणार आहेत. आम्ही ‘दोन आणि आमचे एक’ धोरण स्वीकारतो. हिंदू समाजाने किमान दोन मुले जन्माला घालायला हवीत, अन्यथा धर्म टिकू शकणार नाही. एका अपत्याला जन्म देणे ही चूक आहे. यामुळे हिंदूंची संख्या कमी होत आहे आणि मुस्लिमांची संख्या वाढत आहे. लोकशाहीत व्होटबँकेच्या राजकारणाला महत्त्व असते. या व्होटबँकेमुळे निवडून आलेल्या व्यक्तीला महत्त्व असते. त्यामुळे भारतामध्ये हिंदूंची संख्या वाढली पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. तुम्ही देश, देव आणि धर्मासाठी काम केले पाहिजे. आमच्यासारखे धर्मगुरु तुम्हाला पाठिंबा देतील. पुरोगाम्यांच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारणे ही दुर्बुद्धी आहे. अध्यात्मातील विज्ञान आणि सामाजिक दृष्टिकोन आपल्याला शांती देतो; विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मनःशांती मिळत नाही. भारत हा एकमेव देश आहे, जो संस्कृतीच्या माध्यमातून मनःशांती देऊ शकतो.
हे देखील वाचा –
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या अयोध्येत ‘धर्म ध्वज’ फडकणार
न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
२० लाख रुपये देऊन चार उमेदवार फोडले! युगेंद्र पवारांचा बारामतीत गंभीर आरोप









