Home / Uncategorized / Sandeep Deshpande : राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक; मनसेचा पलटवार

Sandeep Deshpande : राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक; मनसेचा पलटवार

Sandeep Deshpande : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या संयुक्त सभेत उद्योगपती गौतम अदानी यांच्या झपाट्याने...

By: Team Navakal
Sandeep Deshpande
Social + WhatsApp CTA

Sandeep Deshpande : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या संयुक्त सभेत उद्योगपती गौतम अदानी यांच्या झपाट्याने वाढलेल्या संपत्तीचा आणि मोदी सरकारकडून त्यांना मिळालेल्या उद्योगांचा उल्लेख करत भाजपावर टीका केली होती. या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानी यांचा फोटो पोस्ट करत प्रत्युत्तर दिले. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

“राज ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपाला एवढ्या मिरच्या का झोंबल्या?” असा थेट सवाल संदीप देशपांडे यांनी केला. तसेच, “गौतम अदानी यांनी भाजपच्या लोकांना वकीलपत्र दिले आहे का?” असा टोला लगावत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
देशपांडे म्हणाले की, भाजपमध्ये अनेक वकील आहेत, पण अदानी यांच्यासाठी इतक्या आक्रमकपणे बचाव का केला जातो, हे समजण्यापलीकडचे आहे. “दुसऱ्या उद्योगपतींच्या डोक्यावर बंदूक ठेवून उद्योग ताब्यात घेण्याच्या पद्धतीला आमचा स्पष्ट विरोध आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

या वादातून अदानी समूह आणि भाजप यांच्यातील संबंधांवर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला. महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये अदानी समूहाची वाढती मक्तेदारी, हाच या सभेतील प्रमुख मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अदानी समूहाला मिळणाऱ्या अनन्यसाधारण सवलतींवर प्रश्न उपस्थित केले होते. विशेषतः मुंबई विमानतळाचा प्रकल्प अदानी समूहाकडे कसा गेला, याबाबतच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात आला. यामध्ये जीव्हीके प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला. जीव्हीके समूहावर ईडी आणि आयकर विभागाची कारवाई झाल्यानंतर त्यांचा मोठा हिस्सा अदानी समूहाकडे गेल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

देशपांडे म्हणाले की, “महाराष्ट्रात किंवा देशात येणारे उद्योग ज्या पद्धतीने केवळ अदानी समूहालाच दिले जात आहेत, त्यावर आमचा आक्षेप आहे. इंडिगो कंपनीने कशा प्रकारे संपूर्ण भारताला वेठीस धरले, हे आपण पाहिले आहे. तशीच परिस्थिती अदानी समूहाबाबत निर्माण होऊ नये, हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडला आहे.”

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या