सांगलीत वटपौर्णिमेच्या दिवशी नवविवाहितेकडून पतीची हत्या

newlywed wife killed her husband

सांगली- इंदौरच्या Raja Raghuvanshi Murder Case देशात खळबळ उडाली आहे. लग्नाच्या काही दिवसांनंतर प्रियकराच्या मदतीने पत्नी Sonam Raghuvanshiने पती राजाची हत्या घडवून आणली . ही घटना ताजी असतानाच सांगलीच्या (Sangali) कुपवाड येथेही अशीच एक घटना घडली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशीच सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्ये नवविवाहितेने पतीची कुऱ्हाडीने हत्या केली. अनिल तानाजी लोखंडे (५० ) असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी (Police) पत्नी राधिका इंगळे (२७) हिला अटक केली आहे.

अनिल लोखंडे आणि राधिका इंगळेचे १७ मे रोजी लग्न झाले होते. अनिलची पहिली पत्नी मयत झाल्यानंतर त्यांनी राधिकाशी विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये घरगुती वाद वाढू लागले. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात ठेवत राधिकाने वटपौर्णिमेच्या रात्री अनिल झोपेत असताना त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून त्याची हत्या केली.