Home / Uncategorized / Sharad Pawar :शरद पवारांचा नाशिकमध्ये १४ सप्टेंबरला शेतकरी मोर्चा

Sharad Pawar :शरद पवारांचा नाशिकमध्ये १४ सप्टेंबरला शेतकरी मोर्चा

Sharad Pawar

Sharad Pawar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Elections)पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे १४ आणि १५ सप्टेंबरला रविवारी, सोमवारी नाशिक (Nashik)दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पक्ष संघटना बळकट करणे, निवडणूक रणनीती आखणे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न (Farmers)सरकारसमोर मांडणे यावर भर दिला जाणार आहे.

१४ सप्टेंबर रोजी नाशिक शहरात विशेष कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात शरद पवारांसह पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या शिबिरातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती ठरवली जाणार आहे.

१५ सप्टेंबरला नाशिक शहरात भव्य शेतकरी महामोर्चा (Farmers Rally)काढण्यात येणार आहे. कर्जमाफी, हमीभाव, कांदा दराचा प्रश्न, पीक विमा, ऊस उत्पादकांचे प्रश्न, अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, तसेच शेतकऱ्यांवर लादले जाणारे निर्बंध अशा विविध ज्वलंत प्रश्नांवर सरकारला जाब विचारला जाणार आहे. या महामोर्चात पवारांसह राज्य व देश पातळीवरील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

1 सप्टेंबरपासून 8 मोठे बदल लागू; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; जाणून घ्या सविस्तर

फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…

महिन्याला फक्त 13 हजार भरा आणि घरी घेऊन जा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; वाचा सविस्तर