T20 World Cup 2026 Qualified Teams: पुढील वर्षी होणाऱ्या ICC पुरुष T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) 20 संघानी अंतिम स्थान निश्चित केले आहे. या विश्वचषकासाठी पात्र ठरणारा अंतिम संघ संयुक्त अरब अमिराती (UAE) ठरला आहे.
6 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होणार आहे. अल अमेरत क्रिकेट मैदानावर झालेल्या T20 विश्वचषक आशिया-ईएपी पात्रता फेरीच्या सुपर सिक्स सामन्यात जपानला पराभूत करून UAE ने पात्रता मिळवली.
UAE ने जपानने दिलेले 119 धावांचे लक्ष्य अवघ्या 12.1 षटकांत पूर्ण केले. या विजयामुळे UAE ने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आणि जपान, सामोआ आणि कतार या संघांचे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न भंगले.
T20 World Cup 2026: नेपाळ आणि ओमाननेही मिळवले स्थान
याआधी ओमान आणि नेपाळनेही 2026 च्या स्पर्धेतील आपले स्थान सुरक्षित केले होते. ओमान 18 वा, तर नेपाळ 19 वा संघ ठरला होता. नेपाळने गट फेरीतील दोन सामने जिंकल्यानंतर सुपर सिक्समधील चारही सामने जिंकून या स्पर्धेतील आपले अपराजित (Unbeaten) यश कायम राखले आहे.
UAE चा T20 विश्वचषकातील हा तिसरा प्रवेश असेल. यापूर्वी त्यांनी 2014 आणि 2022 च्या विश्वचषकात भाग घेतला होता, परंतु दोन्ही वेळी त्यांना पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले होते. आगामी स्पर्धा ही 2024 च्या मागील विश्वचषकानंतरची दुसरी 20 संघांची स्पर्धा असेल.
T20 World Cup 2026: विविध पात्रता फेरीतून पात्र ठरलेले संघ:
पात्रता फेऱ्यांतून 8 संघांनी स्थान निश्चित केले आहे:
- अमेरिका खंडातील: कॅनडा
- युरोपमधील: इटली आणि नेदरलँड्स
- आफ्रिकेतील: नामिबिया आणि झिम्बाब्वे
- आशिया आणि ईएपी (Asia & EAP) मधील: ओमान, नेपाळ आणि UAE
T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळणारे सर्व संघ: विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या सर्व संघांची यादी खालीलप्रमाणे आहे:
भारत (सह-यजमान), श्रीलंका (सह-यजमान), अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, युनायटेड स्टेट्स, वेस्ट इंडीज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, ओमान, नेपाळ आणि UAE
हे देखील वाचा – ट्रम्प खोटे बोलले? पंतप्रधान मोदींशी कोणताही फोन झाला नाही; रशियाच्या तेल खरेदीच्या दाव्यावर भारताचे स्पष्टीकरण