Home / Uncategorized / Claims Sanjay Raut : कोणाच्याही टेकू शिवाय ठाकरे बंधूंचाच महापौर ! संजय राऊतांचा दावा

Claims Sanjay Raut : कोणाच्याही टेकू शिवाय ठाकरे बंधूंचाच महापौर ! संजय राऊतांचा दावा

Claims Sanjay Raut – मुंबईत कोणाच्याही टेकूशिवाय ठाकरे बंधूंचाच (Thackeray Brother) महापौर होणार, असा दावा उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत (...

By: Team Navakal
sanjay raut

Claims Sanjay Raut – मुंबईत कोणाच्याही टेकूशिवाय ठाकरे बंधूंचाच (Thackeray Brother) महापौर होणार, असा दावा उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत ( UBT MP ) यांनी आज केला. भाजपाने कितीही वल्गना केल्या तरी मुंबई ठाकरे बंधूंच्या समोर भाजपाला कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येणार नाही,असेही राऊत यांनी छातीठोकपणे सांगितले.


मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत भाजपाने दीडशेहून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) आज अचानक दिल्लीला गेले. या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधींशी राऊत बोलत होते.काहीही झाले तरी मुंबईत भाजपाची (BJP)डाळ शिजणार नाही, शिंदेसेनेचीही नाही आणि अजित पवारांची तर नाहीच नाही. मुंबईचा महापौर हा शुद्ध मराठी, मराठी मनाचा, भगव्या विचारांचा आणि ठाकरे बंधूंचाच होणार,असे राऊत म्हणाले.


भाजपाच्या दीडशे प्लसच्या घोषणेबद्दल विचारले असता, मुंबईत भाजपा दीडशे जागा जिंकणार, एकनाथ शिंदे १२० जागा जिंकणार आणि अजित पवार (Ajit Pawar)किमान १०० जागा जिंकणार. मग आम्हाला हरी हरी करत केदारनाथला मोदींच्या गुहेत जावे लागणार,असा उपरोधिक टोला राऊत यांनी लगावला.


हे देखील वाचा –

एलआयसीवर केंद्राचा दबाव; अदानीत अब्जावधीची गुंतवणूक

राम मंदिराचे काम पूर्ण झाले; मोदी धर्मध्वज फडवकणार

रेल्वेत सरकारी नोकरीची संधी अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती?

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या