Home / Uncategorized / Vaishnavi Hagawane शस्त्र परवाना प्रकरणात सुशील हगवणेला जामीन

Vaishnavi Hagawane शस्त्र परवाना प्रकरणात सुशील हगवणेला जामीन

पुणे – खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुशील हगवणेला पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. सुशील हगवणेवर...

By: Team Navakal
Sushil Hagwane granted bail in arms license case

पुणे – खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुशील हगवणेला पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. सुशील हगवणेवर अदखलपात्र आणि जामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरनलपल्ले यांनी ही मागणी फेटाळून ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या हमीवर जामीन मंजूर केला. मात्र तो वैष्णवी आत्महत्या प्रकरणी कोठडीतच राहणार आहे .

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा पती शशांक, दीर सुशील, सासू-सासरे, नणंद तसेच नीलेश चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. शशांक, सुशील आणि नीलेश या तिघांनी एकाच वर्षी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाने मिळवले होते. मात्र, परवाना मिळवण्यासाठी त्यांनी पुण्यातील निवास पत्ता बनावट दाखवला होता. वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या करारनाम्यांच्या आधारे परवाना मिळवण्यात आल्याचे तपासात उघड झाले. त्याच दरम्यान, कोथरूड पोलिसांनी न्यायालयाचे प्रॉडक्शन वॉरंट घेऊन सुशील हगवणेला येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले आणि शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केले.

कोथरूड पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीने बनावट पत्ता दाखवून शस्त्र परवाना घेतला. या परवान्याच्या आधारे पिस्तुलाचा गैरवापर झाल्याची शक्यता तपासण्याची गरज आहे. काडतुसे किती आणि कुठून मिळवली, बनावट भाडेकराराचा उपयोग कसा झाला याचाही तपास बाकी आहे. त्यामुळे सात दिवसांची कोठडी आवश्यक असल्याची मागणी पोलिसांनी केली. मात्र, आरोपीच्या वकिलांनी सर्व कलमे जामीनपात्र असल्याचा युक्तिवाद केला. ॲड. स्वानंद गोविंदवार यांनी सांगितले की, या गुन्ह्यात पोलीस कोठडी देण्याचा प्रश्नच येत नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सुशीलला न्यायालयीन कोठडी सुनावली आणि नंतर जामीन मंजूर केला.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या