बड्या कंपनीत नोकरी मिळावी की सुरक्षा वाटते, भरपूर पगार मिळतो, हळूहळू स्वतःचे घर, दुचाकी, परदेशी ट्रिप, हेल्दी फूड, डिझायनर कपडे असा प्रवास सुरू होतो, पण अचानक आपली कंपनीच बंद पडली तर? बैजू ही शैक्षणिक क्षेत्राशी कंपनी अशीच एकदम बुडाली , ही कंपनी बुडणार आहे याचे काहीच संकेत मिळत नव्हते , किॅबहुना ही कंपनी विस्तार करण्यासाठी परदेशातील अनेक कंपन्या विकत घेत सुटली होती, त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती कमकुवत आहे हे ओळखलेच नाही .
बैजू कंपनीने भरपूर जाहिराती केल्या, क्रिकेट टीमची स्पाॅन्सर बनली, परदेशातील कंपन्या विकत घेत सुटले. असे असताना ही कंपनी डुबणार आहे हे स्वपनातही वाटले नव्हते पण तरीही कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत संकेत नक्कीच मिळत होते. परंतु कंपनीचा बाकी भपका पाहून या चेतावणीकडे लक्षच गेले नाही. पहिली बाब म्हणजे कंपनीने अचानक मोठ्या संसख्येत कर्मचारी कामावरून काढले , दुसरी बाब म्हणजे कंपनी आपला आर्थिक ताळेबंद अहवाल सादर करण्यास दिरंगाई करू लागली.
या संकेतांकडे लक्ष दिले असते आणि वेळीच पर्यायी नोकरीचा शोध घ्यायला सुरूवात केली असती तर युवा पिढिला रस्ता दिसला असता. यासाठी कंपनी बडी असो की छोटी, कंपनीच्या आर्थिक स्थितीवर बाराकाईने लक्ष ठेवले पाहिजे. कंपनी संकेत देते तो समजला पाहिजे.










