काशी विश्वनाथ मंदिरात आता सर्व भक्तांना दर्शन मिळणार

वाराणसी – हिंदू धर्मामध्ये एक विशिष्ट स्थान असलेले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आज मंगळवारपासून सर्व भक्तांना दर्शनासाठी कोणतीही कोरोना चाचणीची अट न घालता सुरू करण्यात आले आहे. सकाळी मंगल आरती झाल्यानंतर सर्वाना प्रवेश देण्यात आला. मंदिराच्या गर्भगृहात जाण्यास मात्र बंदी घालण्यात आली आहे,अशी माहिती मंडल आयुक्त दीपक अग्रवाल यांनी दिली.

या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे काल सोमवारीच संपुर्ण मंदिर निर्जंतुक करण्यात आले होते. तसेच प्रत्येक भाविकांमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवून आखून दिलेल्या वर्तुळामध्ये उभे राहण्याची अट घालण्यात होती. प्रत्येक भाविकाचे तापमान तपासले जात होते.जास्त तापमान असणाऱ्यास प्रवेश दिला जात नव्हता. याआधी १४ एप्रिलपासून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागत होता .मात्र आता कोणतीही चाचणी केल्याचा अहवाल दाखवण्याची गरज नाही.मंदिरातील विधीबाबत काही नियमांचे मात्र पालन करणे बंधनकारक असणार आहे.
[

Scroll to Top