Home / दिनविशेष / दिनविशेष : जागतिक गुलाबजाम दिवस

दिनविशेष : जागतिक गुलाबजाम दिवस

भारतीय पक्वानात गुलाबजामचे स्थान हे मोठे आहे. इतिहासात गुलाबजाम संदर्भातील अनेक रंजक तथ्यांचे वर्णन करण्यात आले आहे. गुलाबजामच्या उगमाची कथादेखील...

भारतीय पक्वानात गुलाबजामचे स्थान हे मोठे आहे. इतिहासात गुलाबजाम संदर्भातील अनेक रंजक तथ्यांचे वर्णन करण्यात आले आहे. गुलाबजामच्या उगमाची कथादेखील इतकीच रंजक आहे. मुघल बादशहा शहाजहानच्या दरबारी असलेल्या एका शाही आचाऱ्याने पारशी आणि तुर्की मिष्ठानांच्या आधारावर काही स्थानिक हलवाईंच्या मदतीने गुलाबजामची निर्मिती केली होती.

पर्शियन बमियाह आणि तुर्कीश तुलांबा हे दोन गोड पदार्थदेखील बहुतांश गुलाबजामशी साधर्म्य साधणारे आहेत. ते पदार्थदेखील मऊ असतात आणि त्यांनादेखील साखरेच्या पाकाच्या माध्यमातून गोडवा प्रदान करण्यात येतो. फक्त गुलाबजाम हा थंड असेल तर वाढला जातो आणि ते गरमा गरम वाढले जातात, हाच काय तो मूळ फरक आहे. या परदेशी पदार्थांची प्रेरणा घेऊनच मुघल आचाऱ्यांकडून गुलाबजामचा आविष्कार केला गेला होता.

गुलाबजामच्या परिवारात एक अजून प्रकार आहे, जो भारतातील बहुतांश लोकांचा लाडका आहे. तो म्हणजे काला जाम अथवा काला जामून. काळ्या आणि जांभळ्या रंगाचा हा गुलाबजाम नेहमीपेक्षा जास्त गोड असतो आणि अधिक तापमानावर तयार केला जातो. भारताच्या बहुतांश भागात हा काला जामून सहज उपलब्ध होतो.

  • संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या