Home / News / पवई तलाव ओव्हरफ्लोऔद्योगिक क्षैत्राला दिलासा

पवई तलाव ओव्हरफ्लोऔद्योगिक क्षैत्राला दिलासा

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईतील पवई तलाव आज पहाटे ४.४५ वाजता भरून वाहू लागला. या तलावांचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे औद्योगिक...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईतील पवई तलाव आज पहाटे ४.४५ वाजता भरून वाहू लागला. या तलावांचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे औद्योगिक वापरासाठी आणि आरे दुग्घ वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. त्यामुळे या तलावावर अवलबूंन असलेल्या औद्योगिक क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.१८९० साली १२.५९ लाख रुपये खर्चुन हा कृत्रिम तलाव बांधण्यात आला होता. पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र ६.६१ किलोमीटर आहे. तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ २.२३ चौरस किलोमीटर एवढे होते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.

Web Title:
संबंधित बातम्या