Home / News / वांद्र्यात महापालिका उभारणार २३ कोटींचा नवा जलतरण तलाव

वांद्र्यात महापालिका उभारणार २३ कोटींचा नवा जलतरण तलाव

मुंबई- वांद्रे पश्चिमेला असलेल्या एमएटी कॉलेजजवळच्या मैदानात पालिका ऑलिंपिकच्या आकाराचा नवीन जलतरण तलाव बांधणार आहे.अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या या तलावासाठी पालिका...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- वांद्रे पश्चिमेला असलेल्या एमएटी कॉलेजजवळच्या मैदानात पालिका ऑलिंपिकच्या आकाराचा नवीन जलतरण तलाव बांधणार आहे.
अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या या तलावासाठी पालिका २३ कोटी ९६ लाख ८३ हजार ६२५ रुपये खर्च करणार आहे. याठिकाणी महिलांसाठी विशेष बॅच असणार आहे.

हा नवीन जलतरण तलाव २५ बाय १५ मीटर क्षेत्रफळ जागेत बांधला जाणार आहे.या जलतरण तलावासोबत याठिकाणी तळ अधिक एक मजली प्रशासकीय इमारतही बांधली जाणार आहे.या इमारतीत प्रशिक्षकांसाठी आणि महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम तसेच स्वच्छतागृह असणार आहे. तसेच महिलांसाठी विशेष बॅच उपलब्ध असणार आहे. या प्रस्तावित जलतरण तलावाचा फायदा वांद्रे पश्चिम आणि खार परिसरातील नागरिकांना होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या