Home / News / दर्शनासाठी ड्रेस कोड बंधनकारकअंधेरीचा राजा मंडळाचा निर्णय

दर्शनासाठी ड्रेस कोड बंधनकारकअंधेरीचा राजा मंडळाचा निर्णय

मुंबई – अंधेरी येथील आझादनगर सार्वजनिक ( अंधेरीचा राजा) उत्सव मंडळाने गणेशोत्सवानिमित्त भाविकांसाठी ड्रेस कोड बंधनकारक केला आहे. शॉर्ट कपडे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – अंधेरी येथील आझादनगर सार्वजनिक ( अंधेरीचा राजा) उत्सव मंडळाने गणेशोत्सवानिमित्त भाविकांसाठी ड्रेस कोड बंधनकारक केला आहे. शॉर्ट कपडे घालणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात येणार आहे.अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना मंडळाकडून बाप्पाचे चरण स्पर्श करून दर्शन घेण्यास परवानगी दिली जाते. मात्र या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या महिला भाविकांनी शॉर्ट कपडे घालू नये, ज्या महिला किंवा मुली शॉर्ट कपडे घालून दर्शनाला येतील त्यांना रोखण्यात येईल आणि त्यांना मंडळाकडून शाल दिली जाईल,असे मंडळाचे खजिनदार सुबोध चिटणीस यांनी सांगितले. भव्यदिव्य देखाव्यासाठी अंधेरीचे मंडळ प्रसिद्ध आहे. या मंडळाने यंदा राजस्थान मधील पाटवा की हवेलीची प्रतिकृती साकारली आहे. या थीममध्ये राजस्थानच्या राजेशाही वारशाचे सादरीकरण अनुभवयाला मिळणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या