मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेमध्ये अखेर कृषी विभागाचा समावेश करण्यात आला आहे. या मागणीसाठी इच्छुक उमेदवारांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश आले आहे.आता कृषी विभागाच्या २५८ जागांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली जाणार आहे.महाराष्ट्र कृषी सेवा -२०२४ परीक्षेतील २५८ जागांपैकी कृषी उपसंचालकाची ४८ पदे, तालुका कृषी अधिकाऱ्याची ५३ पेदे, कृषी अधिकाऱ्याची १५७ पदे या परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी एमपीएससीने आज नव्याने जाहिरात प्रसिध्द केली आहे.इच्छुक उमेदवारांना २७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे.परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर आहे. १ डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा होणार आहे.









