Home / News / शिवसेनेचे माजी आमदारसीताराम दळवी यांचे निधन

शिवसेनेचे माजी आमदारसीताराम दळवी यांचे निधन

मुंबई – निष्ठावंत शिवसैनिक, माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले. अंधेरी विधानसभा मतदारसंघातून १९९५ ला ते शिवसेनेच्या तिकिटावर...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – निष्ठावंत शिवसैनिक, माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले. अंधेरी विधानसभा मतदारसंघातून १९९५ ला ते शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते.त्यापूर्वी ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते.शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते. शिवसेनेच्या जडणघडणीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये दळवी यांचा सहभाग होता.कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोस हे त्यांचे मूळ गाव असून मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्यांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते.मनसे नेते संदिप दळवी यांचे ते वडिल होत.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा संदिप, मुलगी अॅड प्रतिमा आशिष शेलार, सून आणि नातंवडे असा पिरवार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या