Home / News / १९ ते २४ आॅक्टोबर मुंबईत मामी चित्रपट महोत्सव

१९ ते २४ आॅक्टोबर मुंबईत मामी चित्रपट महोत्सव

मुंबई – मुंबईच्या सिनेवर्तुळात प्रतिष्ठेचा मानला जाणारा मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १९ ते २४...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – मुंबईच्या सिनेवर्तुळात प्रतिष्ठेचा मानला जाणारा मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईतील आयनॉक्स पीव्हीआर आणि रिगल या चित्रपटगृहांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यंदा या महोत्सवात जगभरातील पन्नासएक विविध भाषांमधील ११० हून अधिक चित्रपटांची पर्वणी सिनेरसिकांना अनुभवता येणार आहे.महोत्सवातील विभागांमध्ये दक्षिण आशिया स्पर्धा, फोकस दक्षिण आशिया (स्पर्धाबाह्य), जागतिक सिनेमा, ट्रिब्युट्स, रिस्टोर्ड क्लासिक्स, गाला प्रीमियर्स, मास्टरक्लासेस, डायमेंशन मुंबई आणि रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स यांचा समावेश असणार आहे. तसेच यावर्षी २० पेक्षा जास्त वर्ल्ड प्रीमियर्स, २५ पेक्षा जास्त आशिया प्रीमियर्स आणि ३५ पेक्षा जास्त दक्षिण आशिया प्रीमियर्स होणार आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या