पणजी – गोवा राज्यातील सर्व रेशन धान्य दुकानांना ‘कलर कोड’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रेशन धान्य दुकान लोकांना ओळखता आली पाहिजे त्यासाठी सर्व दुकानांना लवकरच भगवा रंग देण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभरात केली जाईल, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नागरी पुरवठा खात्याने उत्तर गोव्यातील सर्व रेशन धान्य विक्री करणाऱ्या दुकान मालकांची बैठक घेतली. या खात्याचे संचालक जयंत तारी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकान मालकांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला उत्तर गोव्यातील सुमारे २५० मालकांनी उपस्थिती लावली होती.
