Home / News / १ कोटी ५८ लाखांची रोकड जळगावमध्ये जप्त

१ कोटी ५८ लाखांची रोकड जळगावमध्ये जप्त

जळगाव- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस पथकाने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस पथकाने ऑपरेशन ऑल आउट, कोंबींग आणि नाकाबंदी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

जळगाव- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस पथकाने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस पथकाने ऑपरेशन ऑल आउट, कोंबींग आणि नाकाबंदी केली होती. यामध्ये १ कोटी ५८ लाखाची रोकड, ६ लाख १३ हजार रुपयाचे मद्य आणि ३ लाख १० हजार अंमली पदार्थ असा एकूण तब्बल १ कोटी ९० लाख ६५ हजार ४१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
चार दिवसांपूर्वी सांगोल्यात ५ कोटींची रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाची भरारी पथके आणि पोलिसांची नाकाबंदी सुरुच आहे याच नाकाबंदी मध्ये १ कोते ५८ लाखांच्या रोकडसह १ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title:
संबंधित बातम्या