Home / News / तासगावात रोहित पाटलांसमोर प्रभाकर पाटील यांचे आव्हान

तासगावात रोहित पाटलांसमोर प्रभाकर पाटील यांचे आव्हान

सांगली – माजी उप मुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील याना शरद पवार गटाकडून तासगाव विधानसभा मतदार संघातून...

By: E-Paper Navakal

सांगली – माजी उप मुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील याना शरद पवार गटाकडून तासगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे . मात्र कोणत्याही परस्थितीत त्यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी चक्रव्यूह तयार केला आहे. महायुतीमध्ये हा मतदार संघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटला आहे. त्यामुळे इथून त्यांनी भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील याना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे .
रोहित पाटील गेल्या तीन – चार वर्षांपासून विधानसभेची तयारी करीत आहेत. रोहित पाटील यांचा जनसंपर्क चांगला तसचे प्रबळ विरोधक नसल्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक रोहित पाटील यांच्यासाठी काहिशी सोपी जाईल, असे वाटत होते. पण रोहित पाटलांना पराभूत करण्याचा अजित पवारांनी चक्क भाजप नेत्याच्या मुलाला राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याचा नियरण्य घेतला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या