Home / News / पिंपरीमध्ये तीन बॉम्बसदृश बॉम्ब सापडल्याने खळबळ

पिंपरीमध्ये तीन बॉम्बसदृश बॉम्ब सापडल्याने खळबळ

पिंपरी- पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी प्रेमलोक पार्क परिसरात आज तीन बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ उडाली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपची गळती...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पिंपरी- पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी प्रेमलोक पार्क परिसरात आज तीन बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ उडाली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपची गळती थांबण्यासाठी खोदकाम सुरू असताना त्यांना बॉम्बसदृश वस्तू सापडल्या.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरच हा सर्व प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांचे बॉम्बशोधनाशक पथक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकाच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थली दाखल झाले. पथकाने या बॉम्बसदृश वस्तूंची तपासणी केली. त्यानंतर या वस्तू ताब्यात घेतल्या.

Web Title:
संबंधित बातम्या