Home / News / साताऱ्यात ऊस पेटवला! शेतकऱ्याचे मोठे नुकसान

साताऱ्यात ऊस पेटवला! शेतकऱ्याचे मोठे नुकसान

सातारा – सातारा तालुक्यातील पाटखळ गावातील काजू मळा शिवारात स्थानिक शेतकऱ्यांचा दोन एकर ऊस अज्ञात व्यक्तींनी पेटवला. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सातारा – सातारा तालुक्यातील पाटखळ गावातील काजू मळा शिवारात स्थानिक शेतकऱ्यांचा दोन एकर ऊस अज्ञात व्यक्तींनी पेटवला. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव येथे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पाठखळ गावातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्या शेतातील ऊस पेटवण्यात आला, असा एका गटाने आरोप केला आहे. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे, याबाबत आमदार महेश शिंदे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा पोलीस मुख्यालयात जाऊन ग्रामस्थांच्या सोबत भेट घेतली आणि स्थानिक गुन्ह अन्वेषण विभागामार्फतच या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या