Home / News / २५ नोव्हेंबरपासून लोकसभेचे हिवाळी अधिवेशन

२५ नोव्हेंबरपासून लोकसभेचे हिवाळी अधिवेशन

नवी दिल्ली – लोकसभेचे पहिले हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात ‘वन...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – लोकसभेचे पहिले हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात ‘वन नेशन, वन इलेक्शन’, ‘वक्फ’ विधेयक, ‘जम्मू-काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा’ आदी प्रस्ताव या अधिवेशनात मंजूर केले जाऊ शकतात. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या योजनेला विरोधी पक्षांचा विरोध आहे. देशात एकाचवेळी सर्व निवडणुका होऊ नयेत, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. जुन्या संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात एक विशेष संयुक्त बैठक आयोजित केली जाऊ शकते.

Web Title:
संबंधित बातम्या